Economyमहाराष्ट्र

महागाईची ‘गुढी’! पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात उसळी

चांदीने देखील दरात घेतली मोठी झेप


गुढी पाडव्याच्या सणानिमित्त सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, चांदीने आधीच विक्रमी उसळी घेतली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ नोंदवली गेली असून, लवकरच 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चांदीने देखील मोठी झेप घेत, गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ

सोमवार व मंगळवारी सोन्याचे दर अनुक्रमे 210 आणि 330 रुपयांनी घसरले होते.

बुधवारी 110 आणि गुरुवारी 440 रुपयांची वाढ, एकूण 550 रुपयांची उसळी.

सध्या 22 कॅरेट सोने 82,500 रुपये, तर 24 कॅरेट सोने 89,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

चांदीच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मागील काही दिवसांत किंमती घसरल्यानंतर बुधवारी 1,000 रुपयांची भरारी घेतली. एक किलो चांदीचा भाव 1,02,000 रुपये झाला आहे.

जल्लोष नववर्षाचा, गुढीपाडव्याच्या उत्साहात महाराष्ट्र दंग; घराघरात गुढ्या उभारून सणाचा जल्लोष

ताजे सोन्या-चांदीचे दर (IBJA नुसार)

24 कॅरेट सोने: ₹88,417 प्रति 10 ग्रॅम

23 कॅरेट सोने: ₹88,063 प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट सोने: ₹80,990 प्रति 10 ग्रॅम

18 कॅरेट सोने: ₹66,313 प्रति 10 ग्रॅम

14 कॅरेट सोने: ₹51,724 प्रति 10 ग्रॅम

चांदी (1 किलो): ₹99,775

महागाईचा नवा उच्चांक?

सोन्या-चांदीच्या या दरवाढीमुळे लग्नसराई आणि गुंतवणुकीच्या हंगामात नागरिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांना मोठा खर्च करावा लागू शकतो, तर गुंतवणूकदारांसाठी ही संधी असू शकते.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button