टेक्नॉलॉजी डेस्क : गूगल वेळोवेळी एखाद्या खास दिवशी वेगळं डूडल सादर करत असतो. गूगलने एक नवीन आणि इंटरऍक्टिव्ह डूडल सादर केलं आहे, ज्याचं नाव आहे ‘राईज ऑफ द हाफ मून एप्रिल’.
या खास डूडलमध्ये या महिन्यातील शेवटचा अर्धा चंद्र (हाफ मून) दाखवण्यात आला आहे. पण यावेळी गूगलने फक्त चंद्राची सुंदरता दाखवली नाही, तर एक मजेदार कार्ड-आधारित गेम देखील आणला आहे. या गेममध्ये तुम्ही चंद्राच्या विविध टप्प्यांविषयी (phases) माहिती मिळवू शकता आणि या गेमच्या माध्यमातून या खास क्षणाचा आनंद घेऊ शकता.
‘हाफ मून’ म्हणजे काय?
‘हाफ मून’हा टप्पा तेव्हा येतो जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्यअशा पद्धतीने स्थित असतात की पृथ्वीवरून चंद्राचा फक्त अर्धा भागच दिसतो. हा टप्पा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान येतो आणि दर महिन्याला सुमारे दोन दिवसांसाठी स्पष्टपणे पाहता येतो.
