वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीज बिलात मिळणार मोठी सूट
एप्रिलपासून वीज बिलात कपात होणार

मुंबई/सहदेव खांडेकर : महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! १ एप्रिलपासून राज्यातील वीज दरांमध्ये १०% ते ३०% कपात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) हा निर्णय घेतला असून, विविध ग्राहक वर्गांसाठी वीज दर कमी करण्यात आले आहेत.
दर कपातीमागचं कारण काय?
महावितरणकडे (MSEDCL) ₹४४,४८० कोटींचा महसूल शिल्लक असल्याचे MERC च्या अहवालात स्पष्ट झाले. यामुळे पुढील पाच वर्षांसाठी वीज दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दर कमी होण्याची दोन मुख्य कारणे:
वितरण तोट्यात वाढ – महावितरणला वीज वितरणातील तोटा कमी करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करता आलं नाही. अपेक्षित १४% ऐवजी हा तोटा २२% वर कायम राहिला.
Big Breaking : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगोलमध्ये कोसळला एलियन? नागरिक म्हणाले…
नवीकरणीय ऊर्जेचा प्रभाव – राज्यात सौर आणि इतर नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प वाढत असल्याने वीज निर्मितीचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी MERC ने दर कपातीचा निर्णय घेतला.
कोणत्या ग्राहकांना फायदा होणार?
घरगुती ग्राहक – एप्रिलपासून वीज बिलात कपात होणार
उद्योगधंदे – उच्च दाब (HT) उद्योगांसाठी १५% आणि निम्न दाब (LT) उद्योगांसाठी ११% दर कपात
वकिलांची कार्यालये – आता व्यावसायिक ऐवजी सार्वजनिक सेवांमध्ये गणना, त्यामुळे वीज दर कमी
सौर ऊर्जा वापरणारे ग्राहक – घरगुती सौर पॅनल धारकांना ‘टाइम ऑफ डे’ शुल्कातून सूट मिळणार
उद्योगांसाठी मोठा दिलासा
उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाऊ नयेत यासाठी औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दर प्रति युनिट ₹१०.८५ वरून ₹९.२० करण्यात आले आहेत.
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. यामुळे भविष्यात वीज दर आणखी कमी होतील आणि ग्राहकांवरील क्रॉस-सब्सिडीचा भारही हलका होईल.