सोलापूर : श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिराजवळील पार्किंगमध्ये ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने देवीच्या दर्शनासाठी गाडीने आली होती. दर्शनासाठी जाताना त्यांनी आपली पर्स जीपच्या मधल्या सीटवर ठेवली होती. त्या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण ५०,७०० किंमतीचा ऐवज होता.
मात्र, त्या दर्शनासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने जीपमधील पर्स लंपास केली. या प्रकारानंतर मंदिर परिसरात काही वेळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
