पुणे/सहदेव खांडेकर : समाजप्रबोधनकार ह.भ.प इंदुरीकर महाराज हे नेहमीच त्यांच्या कीर्तनातून चर्चेत असतात. त्यांनी तरुण पिढी व कुटुंबव्यवस्थेवर आपल्या कीर्तनातून भाष्य करताना म्हणाले मुली “लायकी नसलेल्या” मुलांच्या प्रेमात पडत असल्याने त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना इंदुरीकर म्हणाले.
इंदुरीकर महाराज म्हणाले, “आजचा तरुण गैरमार्गाने संपत्ती कमावतो आणि व्यसनांच्या आहारी जातो. व्यसनाधिनतेमुळे कुटुंबात अराजकता निर्माण होत असून संसार उद्ध्वस्त होत आहेत. मुली लायकी नसलेल्या मुलांच्या प्रेमात अडकत आहेत, यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे.”
दारूच्या आहारी गेलेल्या कर्त्या पुरुषामुळे संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. आज १६-१७ वर्षांची मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. पालकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आजोबा-आजी नातवंडांना मांडीवर घेऊन खेळवू शकत नाहीत, हे आजच्या कुटुंबव्यवस्थेचे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले.
