मुंबई / प्रतिनिधी: येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
“पक्षाची बांधणी बळकट करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय सुनिश्चित करा,” असा स्पष्ट संदेश त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगली आणि कोल्हापूरमधील पुरपरिस्थितीचा आढावा घेतला असून, “या भागांमध्ये यंदा पुराचा धोका राहणार नाही, याची खात्री सरकारने केली आहे,”
असे आश्वासन त्यांनी दिले. संबंधित यंत्रणांना योग्य उपाययोजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या या निवडणुकांसाठी पक्षाने तयारी सुरू केली असून, विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना एकत्रित करून संघटनात्मक बळ वाढवण्यावर भर दिला जात आहे.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983
