शेतकऱ्यांना २४.८४ कोटींचे एसएचसी कार्ड:पंतप्रधान नरेंद्र मोदी
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था,कृषी विज्ञान केंद्रे शेतकऱ्यांना सल्ला देतात

नवी दिल्ली:जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे घटते प्रमाण रोखण्यासाठी भारत सरकारने जमिनीची स्थिती सुधारण्यासाठी आणि टिकाऊ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना 24.84 कोटींहून अधिक ‘मृदा आरोग्य कार्ड’ (एसएचसी) देण्यात आली आहेत, ज्यात जमिनीचा पीएच, पोषक तत्वांची पातळी आणि सेंद्रिय कार्बनच्या प्रमाणाची तपशीलवार माहिती दिली आहे. ही कार्डे शेतकऱ्यांना एकात्मिक पोषक व्यवस्थापनाबाबत (आयएनएम) मार्गदर्शन करतात, ज्यामुळे रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खते आणि जैव-खतांचा संतुलित वापर वाढतो.
महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये हवामानाचा तडाखा, IMD दिला इशारा
जागरूकता वाढवण्यासाठी सुमारे 7 लाख शेती प्रात्यक्षिके, 93,781 प्रशिक्षण कार्यक्रम आणि 7,425 शेतकरी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (एटीएमए) आणि कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) नियमितपणे सल्ला देतात, तर 70,002 प्रशिक्षित कृषी सखी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड समजून घेण्यासाठी आणि टिकाऊ पद्धती अवलंबण्यास मदत करतात.
याव्यतिरिक्त, सरकार परंपरागत कृषी विकास योजने (पीकेव्हीवाय) द्वारे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे, जी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे समूह तयार करण्यासाठी मदत करते. उत्पादन, प्रक्रिया, प्रमाणीकरण आणि विपणनासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे एक टिकाऊ पुरवठा साखळी तयार केली जाऊ शकते. कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात या उपक्रमांची माहिती दिली.