देश- विदेश

३६ तासांपासून इंधन पुरवठा ठप्प; एचपीसीएलच्या तांत्रिक बिघाडामुळे खळबळ


नाशिक  / प्रतिनिधी : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) च्या सॅप प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील ३६ तासांपासून इंधन पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. देशभरातील एचपीसीएलच्या सर्व डिपोंमधून पेट्रोल पंपांना पुरवठा बंद असून, महाराष्ट्रात अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपण्याच्या स्थितीत आहे.

नाशिक जिल्ह्यातील एकूण ५५० पेट्रोल पंपांपैकी सुमारे १७० पंप एचपीसीएलचे आहेत. यापैकी सुमारे २० टक्के पंप पूर्णपणे कोरडे झाले आहेत, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन (फामफेडा)चे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिली.

“कंपनीचे तज्ज्ञ सिस्टिम पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, सर्व यंत्रणा एकमेकांशी संलग्न असल्यामुळे सुधारणा अपेक्षेप्रमाणे होत नाही. जर तांत्रिक सुधारणा लवकर न झाल्यास स्थिती सामान्य होण्यासाठी आणखी ४८ तास लागतील.”

नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करत अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे. “इंधनाची कोणतीही टंचाई नाही. ही फक्त तांत्रिक अडचण आहे. इंडियन ऑईल व भारत पेट्रोलियम यांसारख्या इतर कंपन्यांचा पुरवठा सुरळीत आहे,”

जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे यांचे आश्वासन:
नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी देखील नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत सांगितले, “बहुतांश एचपीसीएल पंपांवर पुरेसा साठा असून, बीपीसीएल आणि आयओसीचा पुरवठा सुरळीत आहे.”


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button