देश- विदेशमनोरंजन

माजी खासदाराचे वैवाहिक आयुष्य वादाच्या भोवऱ्यात: चर्चा सुरु…


विशेष प्रतिनिधी: अभिनेत्री आणि माजी खासदार नुसरत जहां पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचं दुसरं लग्न अभिनेता यश दासगुप्ता याच्यासोबत झाल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे.

मुलगा ईशानच्या जन्मानंतर काही काळ सर्व काही सुरळीत असतानाच, सध्या नुसरत आणि यश यांचं नातं तणावात गेल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे, नुसरतने इंस्टाग्रामवर यशला अनफॉलो केलं असून, यशनेही तसंच केल्याचं समोर आलं आहे.

दोघे एकत्र एका फॅशन शोमध्ये सहभागी होणार होते, मात्र यश अनुपस्थित राहिला. तसेच यश पुन्हा आपल्या पूर्व गर्लफ्रेंड पूनमच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर झळकत आहेत.

दरम्यान, नुसरतने इंस्टाग्राम स्टोरीवर “ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्या सोडून देणं केव्हाही चांगलं…” असे विचार शेअर करत सूचक संदेश दिला.

नुसरत आणि यश यांनी त्यांच्या लग्नाची बातमी सुरुवातीला गुप्त ठेवली होती. त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव यशान आहे. दोघेही अनेक चित्रपटांत एकत्र झळकले असून त्यांच्या जोडीला चाहत्यांनी नेहमीच पसंती दिली आहे.

सध्या हे नातं कुठल्या वळणावर पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button