
सांगोला/प्रतिनिधी : वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, वनपाल जुनोनी व वनरक्षक (Forest Department) ह. मंगेवाडी यांनी ह. मंगेवाडी नियत क्षेत्रात पाहणीवेळी दि.26.07.2025 रोजी सदरचा ट्रक क्र.MH 10 AW 8622 विनापरवाना कडूलिंब जळावु लाकुड व चिंच जळावू लाकुड वाहतूक करत असताना जप्त केला. (Forest Department)
जवळा ते हातीद रस्ता येथे फिरती करत असताना दि. 26.07.2025 रोजी सायंकाळी 05.30 वा. च्या दरम्यान वाहनाची तपासाणी केली असता ट्रक क्र. MH 10 AW 8622 मध्ये कडूलिंब जळावु लाकुड व चिंच जळावू लाकुड 26.20 घ.मी विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसुन आले. वाहन चालक चंद्रकांत भाऊ अलदर रा.घेरडी यांचेकडे वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक पास परवाना नसल्याचे दिसुन आले.(Forest Department)
पंचनामा, जबाब, कागदपत्रे केली. जप्त लाकूड माल अंदाजे 13 टन व किंमत अंदाजे 40,000/- होईल. 1) चंद्रकांत भाऊ अलदर रा.घेरडी 2) नारायण ज्ञानोबा काशिद रा. कडलास यांनी विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक केले बद्दल लाकुड मालासह ट्रक जप्त केले. या दोन व्यक्तीवर वनरक्षक ह. मंगेवाडी यांनी प्रथम वनगुन्हा क्र.ओ-01/2025 दि.26.07.2025 यानुसार वनगुन्हा नोंद केला आहे. सदर लाकुड माल मालकी क्षेत्रातील पुढील तपास चालु आहे.
वनविभागाचा (Forest Department) वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी. वनविभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी. अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आव्हान श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. प्रत्येक व्यक्तीने झाडांचे संरक्षण करावे. ज्या झाडापासुन धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा. प्रत्येक माणसाला झाडापासुन एका दिवसाला 15 कि. ग्रॉ. ऑक्सीजन लागतो.
ज्या झाडाची गोलाई साधारण 6 ते 7 फुट आहे अशी झाडे सात असल्यास एका माणसाला 15 कि. ग्रॉ. ऑक्सीजन मिळतो असे पर्यावरण तज्ञ यांचे मत आहे. झाडे आहेत म्हणून आपण आहोत याची जाणिव कोरोना (कोव्हीड-19) च्या काळात आपल्याला माहिती झाली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा. तसेच सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. वृक्षतोड बंद करून व जास्तीत जास्त वृक्षलागवड करून सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्त मुक्त करता येईल असे आव्हान श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. यासाठी सर्वानी सहकार्य करणे आवश्यक आहे. वनक्षेत्रात किंवा मालकी क्षेत्रात अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर यांचा मोबाईल नंबर 9420378279 वर संपर्क साधावा. असे आव्हान केले आहे.
सदरची कारवाई मा.मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे-आशिष ठाकरे, तसेच मा. उपवनसंरक्षक, सोलापूर कुलराज सिंह व मा. सहा वनसंरक्षक (कॅम्पा), सोलापूर ए.बी. शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरची कारवाई तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला व एस. एल. वाघमोडे वनपाल जुनोनी, वनरक्षक ह. मंगेवाडी एस. व्ही. नराळे यांनी केली. (Forest Department)