विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून घराघरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. ऐन नवरात्री उत्सवाच्या काळात उभे राहिलेले हे संकट मोठे असल्याने आजी-माजी आमदारांनी तात्काळ गाव भेटी देत लोकांना दिलासा दिला.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे प्रशासनाला निर्देश
पूरस्थितीची पाहणी करताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले की, नुकसानग्रस्त गावांना तातडीने मदत पोहोचवावी आणि कुठल्याही नागरिकाला मदतीपासून वंचित ठेवू नये.
शहाजी बापू पाटील यांनी केला जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा
माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी पूरग्रस्तांना धीर देत म्हटले, मी आहे, तुम्ही काळजी करू नका. त्यांनी गावोगावी भेट देऊन नागरिकांना आधार दिला आणि तातडीने अन्नधान्य, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून दिलासा दिला.
दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले ओला दुष्काळ जाहीर करा
माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारला ठामपणे मागणी केली की, सांगोला तालुक्यास तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली.
