
सांगोला : सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावाच्या (Sangola Accident) हद्दीत बंडगरवाडी पाटीजवळ २ जुलै रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास एका भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू तर दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत फिर्यादी विक्रम सत्यवान चंदनशिवे (वय ३३, रा. बोहाळी, ता. पंढरपूर) यांनी (Sangola Accident) सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत अतुल आबा सावंत (वय ३०) व त्याचा मित्र सुहास संतोष चव्हाण (वय २४, दोघेही रा. कटफळ, ता. सांगोला) हे युनिकॉर्न मोटरसायकल (MH 45/AN 3547) वरून जात असताना पंढरपूर-कराड रस्त्यावर बंडगरवाडी पाटीजवळ कार (MH 43/R 1322) ने पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात अतुल सावंत गंभीर जखमी (Sangola Accident) होऊन उपचारापूर्वीच उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे मृत घोषित करण्यात आले, तर सुहास चव्हाण याच्यावर उपचार सुरू आहे. अपघातानंतर कार चालक अझीम खान हा घटनास्थळावरून कारसह पसार झाला.अपघातामुळे दुचाकी व कारचे सुमारे १०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.