Economy
मिरज-सांगोला रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

सांगोला, विशेष प्रतिनिधी : सांगोला-मिरज रोडवर आज दुपारी एक कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, चालक आणि वाहनातील काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सांगोलाकडून येणारी कार आणि मिरजकडे जात असलेली दुचाकी एकमेकांवर जोरात आदळल्या.
त्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि काही लोक गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ सांगोल्यातील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
या अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती