सांगोला

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन साजरा


सांगोला/प्रतिनिधीः  सांगोला येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ६६ वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष मा.एम. आर. गायकवाड साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर उपस्थित उपाध्यक्ष, प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन केले. त्यानंतर उपाध्यक्षांनी उपस्थितांना संबोधित करत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा

गौरवशाली इतिहास तसेच महाराष्ट्राच्या इतिहासातील स्वातंत्र्यलढ्याचे व सामाजिक कार्याचे स्मरण करून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना कर्तव्यनिष्ठा, सामाजिक भान व

राष्ट्रनिर्माणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. संस्थाध्यक्ष मा. बाबुराव गायकवाड साहेब यांनीही उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा

दिल्या. यावेळी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षके तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय महाराष्ट्र’ च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button