देश- विदेशमहाराष्ट्र

धक्कदायक! मंगळवेढ्यातील बड्या नेत्याला ९ लाखांचा गंडा; तिघा विरुद्ध गुन्हा दाखल


मंगळवेढा/प्रतिनिधी : काळ्या हळदीला परदेशात मोठा बाजारभाव असल्याचे सांगून, करोडोंचा नफा मिळेल अशा आमिषाने एका शेतकरी संघटनेच्या नेत्याची तब्बल ९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दादा सुर्यवंशी (रा. माने गल्ली, मंगळवेढा), गुरुशरण चौहान (रा. अंधेरी, मुंबई), व मुकेश अग्रवाल उर्फ करण परसावत यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक कशी घडली?

फिर्यादी सुरेश पवार (वय ७१, रा. सिध्दापूर) हे शेतकरी संघटनेचे जुने नेते असून, त्यांना दिलीपकुमार धनवे, येताळा भगत, व सिध्देश्वर भगत यांची पूर्वीपासून ओळख आहे. 19 फेब्रुवारी 2022 रोजी, पुणे येथे असताना दिलीप धनवे यांनी पवार यांना अचानक मुंबईला नेले, जिथे आरोपी दादा सुर्यवंशी व गुरुशरण चौहान यांनी काळ्या हळदीच्या व्यापारातून प्रचंड नफा मिळू शकतो, असे सांगितले.

परदेशी बाजारात काळ्या हळदीस प्रति किलो ३००० रुपये असा गोंधळात टाकणारा दर मिळतो, आणि यासाठी १ कोटी ३० लाखांचे कोरियन टेस्टिंग किट आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

विश्वास बसावा म्हणून व्यवहारासाठी करारपत्र तयार करण्यात आले. तसेच आरोपींनी पुण्यातील कार्यालयात ३८ लाख रुपये वेगवेगळ्या व्यक्तींकडून घेतले. यामध्ये फिर्यादी सुरेश पवार यांच्याकडून ९ लाख रुपये उकळण्यात आले. मात्र, व्यवहार पूर्ण न करता आरोपी गायब झाले आणि आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला.

पोलीस तपास सुरू

या प्रकरणाचा तपास मंगळवेढा पोलीस करत असून, अधिक आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारच्या बनावट स्कीम्सपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button