
आटपाडी/ प्रतिनिधी : प्रसिद्ध साहित्यिक, समाजसेवक, नामवंत प्राध्यापक विश्वनाथ जाधव सर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून दोन पुस्तके, १ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दि . ३ जुन रोजी सायं . ५ वाजता आटपाडीत संपन्न होत आहे . मुलुख माणदेश, झपाटलेली माणसे या दोन पुस्तकांसह प्रा . विश्वनाथ जाधव सर यांच्यावरील विश्वम या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते संपन्न होत आहे.
शैक्षणीक, सहकार, कला, क्रीडा, साहित्यीक, सांस्कृतीक, राजकीय क्षेत्रातील दिग्गज माणदेशी नेतृत्व अमरसिंहबापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी प्राचार्य डॉ . कृष्णा इंगोले, माजी प्राचार्य डॉ . सयाजीराजे मोकाशी, निसर्ग व बालकवी सुभाष कवडे, पुरोगामी विचारवंत भाई संपतराव पवार, समिक्षक प्रा . अरुण शिंदे,प्रकाशक इंद्रजित घुले या मुख्य अतिथींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतो आहे . जे . आर . चव्हाण, डॉ . एम . वाय . पाटील, दिनेश देशमुख, मेघा पाटील, पुष्पा मिसाळ, सुधीर इनामदार, डॉ . विनय पत्की, निर्मलकुमार जुगदर, अरुणा चव्हाण, साहेबराव चवरे, प्रदिप पाटील सर, जयसिंह देशमुख सर, शिवाजीराव बंडगर, संभाजीराव गायकवाड, प्रा . विजय शिंदे, प्रा . श्रीकृष्ण पडळकर या मान्यवरांचा या प्रकाशन सोहळ्यात विशेष सहभाग राहणार आहे .
एस . टी . स्टॅन्ड नजीकच्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या कल्लेश्वर मंदिर सभागृहात संपन्न होणाऱ्या या साहित्यीक आणि प्रकाशन सोहळ्यास प्रचंड संख्येने प्रा . विश्वनाथ जाधव प्रेमी आणि साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ . चंद्रसेन जाधव, ॲड . चेतन जाधव, डॉ . सुप्रिया जाधव, प्रा . अनुराधा जाधव यांनी केले आहे .