Fabtech Public School and Junior College
सांगोला/प्रतिनिधी : फॅबटेक एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचा इ. १२ वीचा निकाल शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये अभिमानास्पदपणे १००% लागला आहे. गुणवत्तेचा उच्च दर्जा टिकवून ठेवत सलग पाचव्या वर्षी संस्थेने उत्तुंग यश मिळवले आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांना मिळालेले व्यक्तिगत मार्गदर्शन, शिस्तबद्ध अध्यापन, तसेच शिक्षकांनी दिलेले सातत्यपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन आहे. निकालाच्या गुणवत्तेवरून संस्थेच्या शैक्षणिक बांधिलकीची स्पष्टपणे प्रचिती येते.
प्रमुख गुणवंत विद्यार्थी :
कुमारी सुप्रिया पवार व कुमारी साक्षी मोरे – ७५% गुण, प्रथम क्रमांक
कुमारी प्राप्ती आलदर – ७३.१७% गुण, द्वितीय क्रमांक
कुमार विपुल पाटील व कुमार रविराज मोरे – ७२.३३% गुण, तृतीय क्रमांक
या वर्षी ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणी, तर २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत.
संस्थेच्या नेतृत्वाचे अभिनंदन :
फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक मा. श्री. दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, ए.ओ वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ. वनिता बाबर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
फॅबटेकचे हे यश नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरत असून गुणवत्तेच्या शिक्षणातील एक मानदंड म्हणून संस्थेची ओळख निर्माण होत आहे.
