देश- विदेशमहाराष्ट्र

अत्यंत दुर्दैवी : १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याकडूनच वारंवार अत्याचार


सांगली / प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील पलूसमध्ये एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या बापाने दारूच्या नशेत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई परगावी राहत असल्याने मुलगी आजीसोबत पलूस तालुक्यातील गावात राहत होती. १९ मे रोजी वार्षिक परीक्षा देऊन घरी आल्यावर रात्री ती आजीजवळ झोपली होती.

त्याच रात्री दारू पिऊन घरी आलेल्या बापाने आजीच्या कुशीत झोपलेल्या मुलीला दुसऱ्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीला त्रास होऊ लागल्याने त्याने तिला सोडून दिले.

घरात कोणी नसताना त्याने पुन्हा तेच कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने आपल्या आत्याच्या घरी धाव घेतली, परंतु सुरुवातीला तिने घडल्या प्रकाराबाबत कोणालाही सांगितले नाही. त्यानंतर बापाने गोड बोलून आत्याच्या घरातून तिला पुन्हा घरी नेले आणि पुन्हा अत्याचार केला. या सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने धाडस करून घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.

मुलीची आपबिती ऐकून आईने क्षणाचाही विलंब न करता थेट पोलीस ठाणे गाठले आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले असून, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button