देश- विदेशमहाराष्ट्र

अवैध हुक्का बारला पोलीस संरक्षण! महिन्याला हप्ता घेणारा PSI निलंबित


पुणे / प्रतिनिधी: पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक एका हुक्का पार्लरला संरक्षण देऊन हप्ता स्वीकारल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करत ‘आता तरी सुधारा’ असा स्पष्ट इशारा दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंहमदवाडीतील बारमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध हुक्का विक्री होत असल्याचे आढळून आल्यानंतर गुन्हे शाखा व काळेपडळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ५७ युवक-युवतींना रंगेहाथ पकडले. चौकशीत हॉटेल मालक याने सांगितले की, एप्रिल २०२५ मध्ये हुक्का विक्री सुरू करताना PSI ला रोख ६० हजार रुपये दिले होते, त्यानंतर मे महिन्यात आणखी ३० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात आले.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी PSI वर निलंबनाची कारवाई केली. अवैध धंद्याला प्रोत्साहन देत पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

याआधीही एका श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व अंमलदाराला हुक्का बार चालवणाऱ्यांना आगाऊ माहिती देत सावध केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे अवैध धंदे व त्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button