देश- विदेशमहाराष्ट्र

तिने लिहिले, माझं आता जगायचं नाहीये..! २१ व्या मजल्यावरून उडी मारून इंजिनिअरची आत्महत्या”


पुणे/सहदेव खांडेकर : पुण्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. हिंजवडी परिसरात एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने बिल्डिंगच्या 21व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी पहाटे 4 वाजता हिंजवडी येथील क्राउन ग्रीन सोसायटीत आली होती, जिथे तिची मैत्रीण राहते. तेथे आल्यानंतर काही वेळातच तिने थेट 21व्या मजल्यावरून खाली उडी घेतली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.

आत्महत्येपूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहिली होती. या चिठ्ठीत म्हणते, “मी आता जगणं थांबवलं आहे. मला आता पुढे जगायचं नाही.” तिने आपल्या आई-वडिलांची आणि मित्रांची माफी मागत ही टोकाची कृती केल्याचं लिहिलं होतं.

पोलीस तपासात मिळालेल्या वस्तू:
पोलीसांनी रूमची झडती घेतली असता तिथे आत्महत्या चिठ्ठी, रक्त लागलेले नॅपकिन, कपडे, उशीचा खोळ आणि तिचा मोबाईल सापडला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सध्या तरी पोलीस तपासात कोणतीही घातपाताची शक्यता किंवा कटाचा पुरावा समोर आलेला नाही. मात्र पोलीस सर्व शक्य त्या अंगाने या प्रकरणाची चौकशी करत आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button