कर्मचार्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार : प्रा.राम शिंदे
उच्च शिक्षण मंत्री व उच्चशिक्षण विभागाचे उच्चस्तर अधिकारी यांचे सोबत लवकरच बैठक होणार

सोलापूर/राहुल कोळेकर : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे हे आज सोमवार दि.३१ मार्च रोजी सोलापूर दौर्यावर होते. या दौर्यातील नियोजित कार्यक्रमानुसार त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठाच्या नविन प्रशासकीय इमारत व अहिल्यादेवी स्मारकाच्या बांधकामाची पाहणी केली.
या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री.सुनिल थोरात व राज्य महासंघाचे उपाध्यक्ष सहा.कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे यांनी ना.शिंदे यांचे स्वागत केले. सदर भेटीत सोलापूर विद्यापीठाचा शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा अकृतीबंध, १०.२०.३० आश्वासीत प्रगती योजना, पाच दिवसाचा आठवडा, जुनी पेन्शन योजना इ. विद्यापीठीय कर्मचार्यांच्या प्रश्नाबाबत निवेदन सादर केले.
ना. शिँदे यांनी सदर प्रश्न जाणुन घेवुन याबाबत उच्च शिक्षण मंत्री व उच्चशिक्षण विभागाचे उच्चस्तर अधिकारी यांचे सोबत लवकरच बैठक लावु व प्रश्न निकाली काढु असे आश्वासन दिले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रकाश महानवर, प्र कुलगुरु डॉ.दामा, कुलसचिवा श्रीमती घारे , भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे,काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या सहसंघटनेचे सचिव रविकांत हुक्कीरे, अरविंद कोळेकर, लक्ष्मण चिक्का उपस्थित होते.