विशेष प्रतिनिधी: शिरपूर आगाराच्या एसटी बसमध्ये वृद्ध प्रवाशांशी अयोग्य वर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. एका कंडक्टरने वृद्ध दांपत्याला ‘फुकटचे प्रवासी’ म्हणत बसमधून उतरवले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून कंडक्टरच्या वागणुकीविरोधात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना बस बिघडल्यामुळे दुसऱ्या बसमध्ये वृद्ध दांपत्याला बसवण्यात येत असताना घडली. त्या वेळी कंडक्टरने “हे फुकट प्रवास करणारे आहेत, अधिकारी असते तर वेगळं पाहिलं असतं,” असे वक्तव्य केल्याचे व्हिडिओत ऐकायला मिळत आहे.
या प्रकारानंतर संबंधित कंडक्टरवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी व अशा प्रकारांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983
