अमेझॉनने दिला ग्राहकांना झटका! आता बँक डिस्काउंटवर इतकी प्रोसेसिंग फी
तुम्ही ऑर्डर रद्द केली किंवा परत केली, तरीही ही प्रोसेसिंग फी परत मिळणार नाही

देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अमेझॉनवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त 49 रुपये प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे. त्यामुळे अमेझॉनवरून खरेदी करणे आता महाग होणार आहे.
अमेरिकेच्या “या” महिला अधिकाऱ्यावर चीन का झाले फिदा?
कुणाला द्यावी लागणार 49 रुपये प्रोसेसिंग फी?
ही नवीन 49 रुपयांची प्रोसेसिंग फी सर्व ग्राहकांसाठी लागू नाही. ही फी केवळ इन्स्टंट बँक डिस्काउंट (IBD) वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे. म्हणजेच, जर तुम्ही बँक ऑफरचा वापर करून पेमेंट करत असाल, तर तुम्हाला 49 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
प्राइम मेंबर्सनाही लागू होणार शुल्क
अमेझॉनने स्पष्ट केले आहे की, हे शुल्क त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील “बँक डिस्काउंट ऑफर्सचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया” करण्यासाठी आकारले जात आहे. विशेष म्हणजे, हे शुल्क अमेझॉनच्या प्राइम मेंबर्ससाठी देखील लागू असेल.
रक्कम परत मिळणार नाही!
जर तुम्ही ऑर्डर रद्द केली किंवा परत केली, तरीही ही प्रोसेसिंग फी परत मिळणार नाही. तसेच, ही फी फक्त 500 रुपयांपेक्षा अधिकच्या डिस्काउंटवरच लागू असेल.
ऑनलाइन खरेदी महागडी होणार?
आजकाल लोक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन खरेदी करतात, अगदी लहानसहान वस्तूंसाठी देखील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करतात. मात्र, अमेझॉनच्या या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत, खास करून जे बँक डिस्काउंट ऑफर्सचा लाभ घेतात.