देश- विदेशमहाराष्ट्र
Honeymoon Destinations : कुठं कुठं जायचा हनीमूनला..! ‘हे’ आहेत रोमँटिक ठिकाण

इन पब्लिक न्यूज : लग्नानंतर प्रत्येकजण आपल्या जोडीदारासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी हनीमूनला जाण्याचे स्वप्न पाहतो. मात्र, लग्नातील खर्च पाहता अनेकांना बजेटमध्ये चांगला पर्याय सापडत नाही. पण चिंता करू नका! भारतात अशी अनेक रोमँटिक ठिकाणं आहेत.
१. मनाली : रोमँसची जादू
मनालीला “प्रेमींचे शहर” असेही म्हणतात. हिरवीगार निसर्गसंपत्ती, बर्फाच्छादित पर्वत आणि स्वर्गासारखे नजारे यामुळे हे एक परिपूर्ण हनीमून डेस्टिनेशन आहे. कॉटेज आणि जंगलाच्या जवळ असलेले हॉटेल्स हनीमूनला अधिक रोमँटिक बनवतात. तुम्ही येथे पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग, जंगल सफारी आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

२. नालदेहरा : शांत आणि सुंदर हिल स्टेशन
शिमल्या पासून दूर असलेले नालदेहरा हे हनीमूनसाठी उत्तम पर्याय आहे. शांत वातावरण, हिरवेगार जंगल आणि मोहक निसर्गसौंदर्य जोडप्यांसाठी स्वप्नवत अनुभव देतात. तुम्ही येथे हॉर्स रायडिंग, जिप-लाइनिंग आणि अॅडव्हेंचर वॉकचा आनंद घेऊ शकता. येथे बजेटमध्ये छान कॉटेज किंवा हॉटेल उपलब्ध आहे.

३. जयपूर : बजेटमध्ये राजेशाही अनुभव
तुम्हाला बजेटमध्ये हनीमूनला लक्झरी फीलिंग घ्यायची असेल, तर जयपूर सर्वोत्तम पर्याय आहे. गुलाबी शहराची रंगीबेरंगी गल्ल्या आणि ऐतिहासिक वास्तू तुम्हाला मोहून टाकतील. तुम्ही रामगड तलावात बोटिंग, हवा महलसमोर पारंपरिक जेवण आणि सुंदर किल्ल्यांची सफर करू शकता.

४. हिमाचल प्रदेश : रोमँटिक आणि अॅडव्हेंचरस
दिल्ली-एनसीआर जवळ राहणाऱ्या लोकांसाठी हिमाचल प्रदेशमधील बीर बिलिंग हे एक अप्रतिम ठिकाण आहे. हे ठिकाण पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग आणि मेडिटेशनसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला तिबेटी संस्कृतीचाही अनुभव घेता येईल.

तुमच्या बजेटमध्ये हनीमून होणार!
ही सर्व ठिकाणं अत्यंत कमी खर्चात आणि सुंदर अनुभव देणारी आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण घालवू शकता. तुमच्या हनीमूनची ट्रीप नक्की करा.