विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरात डॉक्टर धनंजय गावडे यांची आणखी एक धक्कादायक बाब समोर आल्याची माहिती मिळत आहे. आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा 108 आणि 1033 च्या काही चालकांवर ‘डायव्हर्शन रॅकेट’मध्ये सामील असल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या सेवेत फोन केल्यानंतर हा फोन यांना कसा काय जातो? रुग्ण घाबरलेल्या अवस्थेत असताना याचाच गैरफायदा घेऊन रुग्णांना जादा रक्कम घेऊन लुट करतात असा आरोप यांच्यावर करण्यात आला आहे?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिक 108 किंवा 1033 वर कॉल करताच रुग्णवाहिका वेळेवर पोहोचते. मात्र नियमांनुसार रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात नेण्याऐवजी थेट संशयितरीत्या डॉक्टर गावडे यांच्या हॉस्पिटलकडे नेले जाते.
जनतेने सवाल केला : हे सर्व ‘पैशाच्या मोबदल्यात’ होत आहे का?
काही रुग्णांनी आणि नातेवाईकांनी असा दावा केला आहे की, सरकारी रुग्णालयात मोफत मिळणारे उपचार टाळण्यासाठी, रुग्णांची आर्थिक स्थिती पाहून त्यांना जाणीवपूर्वक गावडे यांच्या दवाखान्यात नेले जाते.
यानंतर उपचारांच्या नावाखाली लूटमार सुरू होते. अनावश्यक तपासण्या, आयसीयू दाखल, स्कीमचे नाव, आणि शेवटी मोठ्या रकमेची मागणी केली जाते असा आरोप करण्यात आला आहे.
भाग 2 : आपत्कालीन सेवेलाही पैशाचा विळखा? रुग्णवाहिका रुग्णांना गावडे हॉस्पिटलकडे जबरदस्तीने घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार!
बिग ब्रेकिंग! सांगोल्यातील सद् गुरू रुग्णालयावर फसवणुकीचे गंभीर आरोप? रुग्ण लुटमारीच्या तक्रारींनी खळबळ!
