सांगोला सूतगिरणीत१६३ कोटी ६९ लाख ६३ हजारांचा घोटाळा? लाखोंचा दंड?
या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही : चेअरमन डॉ. प्रभाकर माळी

सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरातील गोरगरीब जनतेसाठी शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या. सांगोला स्थापन करण्यात आली. सूतगिरणी नफ्यात होती तसेच अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
दरम्यान, या सूतगिरणीत तब्बल १६३ कोटी ६९ लाख ६३ हजारांचा घोटाळा झाला आहे. सूतगिरण्याच्या मालकी हक्काच्या जागेतील ८७,७३२ ब्रास मुरूम विनापरवाना विकून यामध्ये कोट्यावधीची अफरातफर करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग यांनी रॉयल्टी व दंडात्मक रक्कम रुपये ४२,२७,७४,०६७ एवढ्या रकमेचा बोजा चढवणे गरजेचे असताना अद्याप आकारला नाही. या घोटाळ्यांची तात्काळ चौकशी व्हावी आणि या अजून नक्की किती घोटाळा झाला आहे असे बजरंग पारसे यांनी माहिती दिली. तसेच त्यांनी शासन दरबारी त्याची दाद मागितली आहे.
शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या. सांगोलामधील घोटाळा, कोट्यावधींची लूट आणि लाखोंचा दंड सूतगिणीला आहे का? याबाबत तात्काळ उच्चस्तरीय चौकशी होऊन तात्काळ सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी देखील मागणी बजरंग पारसे यांनी शासन दरबारी केली आहे. तसेच १८ मार्च रोजी ते मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार आहे असे त्यांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना सांगितले.
या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही : चेअरमन डॉ. प्रभाकर माळी
दरम्यान, शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या. सांगोलाचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी इन पब्लिकनशी बोलताना म्हणाले, अशा खोट्या, बिन बुडाच्या तक्रारी सूतगिरणीच्या विरोधात असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी झालेली आहे. तसेच गरज पडल्यास आणखी याबाबत चौकशी होईल. परंतु या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही. तसेच आतापर्यंत अनेकवेळा पत्रव्यवहार झाला असून त्याला उत्तरे देण्यात आली आहेत. त्यामुळे झालेल्या पत्रव्यवहारांमध्ये देखील तथ्य नाही. तसेच दरवर्षी ऑडिट रिपोर्ट होत असून मागील ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व माहिती तंतोतंत असून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही. तसेच ऑडिट रिपोर्ट व इतर कागदपत्रे पडताळणी केली असता तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसून पूर्णतः चुकीचे आहे, असे चेअरमन डॉ.माळी इन पब्लिक न्यूजशी बोलताना म्हणाले.