
Dr Ganpatrao Deshmukh College
सांगोला/विशेष प्रतिनिधी : डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेजमधील एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. क्रीडा शिक्षक विजय पवार या शिक्षकाने (Teacher ) स्वतःहून शाळेची बदनामी करण्याची मागणी चक्क पत्रकारांकडे केली आहे.! ‘बदनामी झालीच पाहिजे, नकारात्मक बातमी पाहायला मिळालीच पाहिजे’ अशी बिनधास्त भूमिका त्यांनी घेतली आहे. (Teacher)
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या पवित्र सणादिवशी दिवशीच, पवार यानी माजी विद्यार्थ्यांकडे शाळेविषयी चुकीची माहिती पसरवली. इतक्यावर न थांबता त्यांनी पत्रकारांशी हुज्जत घातली, भांडण केले यावर न थांबता मारण्याची थेट धमकीही दिली. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. (Teacher)
नशेत शिक्षकी पेशा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे नशेत शाळेत हजर राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “हे शिक्षक नशा केल्याशिवाय शाळेत येतच नाहीत,” (Teacher ) असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत हानिकारक ठरणाऱ्या या वर्तनामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे.
शिक्षकाची बिनधास्त कबुली : “बदनामी तर झालीच पाहिजे! मगच मला बरे वाटेल!”
इन पब्लिक न्यूजशी बोलताना पवार म्हणाले, “या शाळेची बदनामीची माहिती पाहायला मिळाली नाही, अशी माहिती व्हायरल झाली तर मला आनंद वाटेल.” असे का होईना म्हणत याने हुज्जत घालत धमक्याही दिल्या. या अजब वक्तव्यावरून त्यांच्या मानसिकतेची पातळी लक्षात येते. शाळेतील वाद, संस्थापकांविषयी आरोप करत त्यांना शाळेत होत असलेला त्रास त्यांनी व्यक्त केला की काय ?
प्रशासनाचे काय पाऊल?
इतक्या गंभीर आरोपांनंतरही, शाळा प्रशासन आणि शिक्षण संस्थेची गप्प भूमिका अनेक प्रश्न निर्माण करत आहे. याप्रकरणी तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल का? की हा प्रकारही गप्प बसून झाकून टाकला जाईल?
तसेच, इन पब्लिक न्यूजने सांगोला तालुक्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना याबाबत माहिती दिली असून या शिक्षकावर कारवाई होणार की नाही? याकडे संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागले आहे!