
सोलापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात कार्यालयातील कर्मचारी संजय घोडके (लिपिक), पंकज बर्दापूरकर तसेच ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, पत्रकार चंद्रशेखर गायकवाड, साप्ताहिक सोलापूर दणका चे संपादक विश्वनाथ व्हनकोरे,
दै. अग्रणीवार्ता चे संपादक योगेश तुरेराव, साप्ताहिक क्रांतीसिंग चे संपादक संतोष शेलार, आणि साप्ताहिक संत दामाजी चे संपादक सुनील चेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.