महाराष्ट्र

सोलापूर येथे रंगणार भक्तीचा मेळा

विठ्ठल देखियेला डोळां..!संतशिरोमणी सावता महाराजांच्या तसेच अन्य संतांच्या रचनांवर आधारित भक्तीगीतांचा कार्यक्रम


सोलापूर/राहुल कोळेकर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराजांच्या अभंगांवर आधारित “विठ्ठल देखियेला डोळां” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 17 मार्च रोजी संध्याकाळी 6.30 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्वांसाठी प्रवेश खुला  आहे.

छत्रपती संभाजी नगर तलाव  व किल्ला  परिसर सतर्कता भाग घोषित

विठ्ठल देखियेला डोळा या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना ॲड आशिष शेलार मा मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन श्री विकास खारगे माननीय मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांचे लाभले आहे

सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात संतशिरोमणी सावता माळी यांचे अभंग सादर केले जातील. तसेच महाराष्ट्रातील अन्य संतांच्या रचनाही सादर केल्या जाणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी श्रीक्षेत्र अरण येथिल संत सावता महाराजांचे 17 वे वंशज ह.भ.प. रविकांत महाराज वसेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अरण येथिल विद्यार्थ्यांची दिंडी आणि श्रीफळ हंडीचा देखावा सादर करणार आहेत.

या कार्यक्रमात गायक विश्वास शाईवाले, उन्मेष शहाणे, श्रीराम पोतदार, सौ. वीणा बादरायणी, अपूर्वा शहाणे, स्वरदा मोहोळकर हे सर्वजण संत सावता महाराजांसह सर्व संतांच्या रचना सादर करतील. तर समीर जैन रणदिवे, अविनाश इनामदार (सिंथेसायझर), उमेश मोहोळकर (तबला), सन्मित जैन रणदिवे (पखवाज), नंदकुमार रानडे (तालवाद्य) यांची साथसंगत लाभणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन माधव देशपांडे हे करणार आहेत.

सोमवार दिनांक 17 मार्च रोजी संध्याकाळी 6.30 वाजता किर्लोस्कर सभागृहात होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून याचा सर्व सोलापूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री बिभीषण चवरे  यांनी केले आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button