आरोग्यमहाराष्ट्रसांगोला

जागतिक जलदिनानिमित्त माणगंगा नदीची स्वच्छता

नदीचे पावित्र्य राखावे अशा प्रेरणादायी सूचनाचे फलक लावून नदी स्वच्छतेसाठी आवाहन करण्यात आली


सांगोला/महेश लांडगे : जागतिक जलदिनाचे औचित्य साधून दि. २२ मार्च रोजी वाडेगाव ता. सांगोला येथील को.प. बंधारा ते त्रिवेणी संगम परिसरातील नदीपात्राची संपूर्ण स्वच्छता करून वाहतूक पुलाच्या दोन्ही बाजूला सूचनाफलक लावून नदीपात्रात कसलीही घाण किंवा टाकाऊ वस्तु टाकू नयेत.  

नदीचे पावित्र्य राखावे अशा प्रेरणादायी सूचनाचे फलक लावून नदी स्वच्छतेसाठी आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ज्या गावाशेजारी वाहतूक पूल आहेत. त्या सर्व पुलावर असे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती माणगंगा ब्रह्मणसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ घोंगडे यांनी दिली. नदी स्वच्छता फलकाचे उद्घाटन करताना संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे, उपाध्यक्ष डॉ. विजयकुमार जाधव, दत्ता हजारे, सत्यवान कांबळे, अजित साठे, शिवाजी सूर्यगंध इत्यादी सह अनेक नागरिक उपस्थित होते.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button