शेअर बाजारात मोठ्या कंपन्यांसह लहान शेअर्सची २८ वर्षांनी विक्रमी घसरण; आता पुढे काय?
ICICI डायरेक्टच्या टेक्निकल रिसर्च हेड धर्मेश शाह यांनी सांगितले...

मुंबई/सहदेव खांडेकर : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण सुरू असून रिलायन्स, टीसीएस, टाटा मोटर्स आणि एशियन पेंट्ससारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सोसावे लावले आहे. मात्र, फक्त मोठे शेअर्सच नव्हे, तर स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सनीही गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्यात ढकलले आहे. आता बाजारातील ही स्थिती सुधारेल का, हा मोठा प्रश्न आहे.
छोट्या शेअर्सचा मोठा फटका
शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली होती आणि त्यावेळी सर्वाधिक परतावा स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सनी दिला होता. मात्र, आता बाजारात मोठी घसरण झाल्याने हेच शेअर्स गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. फेब्रुवारी महिन्यात शेअर बाजाराने 28 वर्षांचा विक्रमी घसरणीचा उच्चांक गाठला असून स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेटमध्ये घोटाळा
फेब्रुवारीत विक्रमी घसरण
मार्च 2020 नंतर प्रथमच फेब्रुवारी महिन्यात स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारातील पॅनिक सेलिंग (घाबरून शेअर्स विकणे) ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पुढील काळात बाजार सुधारेल का?
स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये घसरण सुरू आहे, हे निश्चित आहे. मात्र, आता गुंतवणूकदारांनी पुढे काय करावे? अधिक शेअर्स खरेदी करावेत, होल्ड करावे की विक्री करावी?
ICICI डायरेक्टच्या टेक्निकल रिसर्च हेड धर्मेश शाह यांनी सांगितले…
गेल्या 20 वर्षांत जेव्हा स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये मोठा घसरणीचा ट्रेंड आला आहे, तेव्हा ही घसरण 25% ते 30% पर्यंत राहिली आहे आणि त्यानंतर बाजाराने जोरदार पुनरागमन केले आहे.
राज्याच्या दोन्हीं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आरोपीवर कठोर करवाई करणार, पाहा काय म्हणाले… https://t.co/1E3PjWuhfx
— inpublicnews (@inpublicnews) March 3, 2025
#marathifun #newschannel #newscast #abpnews #marathinews #marathicelebrity #marathi #marathilook #marathifun #marathistatus #news #EknathShinde #AjitPawar
गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला
स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांनी घाबरून विक्री करू नये. बाजार आणखी खाली जाऊ शकतो, त्यामुळे गुंतवणूक करताना योग्य स्टॉक्सची निवड करावी. दीर्घकालीन बाजार ट्रेंड बघून निर्णय घ्यावा, घाईगडबडीने निर्णय घेऊ नये. सध्या शेअर बाजारात मोठी अस्थिरता आहे, पण इतिहास पाहता बाजार घसरणीनंतर पुन्हा सावरतो, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा.