
नवी दिल्ली : वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी! येत्या जुलै 2025 पासून टाटानगर ते वाराणसी मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. रेल्वे बोर्डाकडून या प्रकल्पासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, टाटानगर स्थानकावर भक्कम पायाभूत सुविधांचा विकास सुरू आहे.
सध्या धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त बसण्याची सुविधा (चेअर कार) असते. मात्र, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये झोपण्याची सुविधा असणार आहे, त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना अधिक आरामदायी अनुभव मिळणार आहे.
या मार्गासाठी काय चालू आहे? -वॉशिंग लाईन क्र. 3 वर उच्चदाब वीज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याचा उपयोग ट्रेनच्या स्वच्छता व देखभालीसाठी होईल.
वंदे भारतची अशी असणार सेवा :
टाटानगरहून सध्या पटना, बर्हमपूर, आणि रांची-राउरकेला-हावडा मार्गांवर वंदे भारत सेवा सुरू आहे. आता रात्री सुरू होणारी वंदे भारत स्लीपर सेवा ही प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
भविष्यात काय अपेक्षित?
– लोको कॉलनीत वंदे भारतसाठी स्वतंत्र सिक लाईन तयार होणार आहे.
– पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही लवकरच स्लीपर वंदे भारत ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.