File Photo
सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील दोन जीबीएस रुग्णावर सांगली येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाला. दोघेही जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, रुग्णालयात दाखल झालेल्यापैकी १२ रुग्ण घरी परतले आहेत. यामध्ये सहा महिला, सहा पुरुष होते. दरम्यान, सांगोला येथील ६० वर्षांची महिला रुग्ण उपचारासाठी दाखल झाली होती उपचारादरम्यान तिचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला.
अर्रर्र… येथे पर्यटकांना भाड्यानं मिळते “बायको”, ‘असा’ करतात करार
यामध्ये सहा महिला, सहा पुरुष असल्याचे डॉ. गुरव यांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेस सहव्याधी असल्याचे समजले.
तज्ञांनी अशी काळजी घेण्यास सांगितले..
हा आजार जितक्या लवकर उपचार सुरू केले जातील तितक्या लवकर आटोक्यात येत असून रुग्णांनी पायात मुंग्या येणे, अशक्तपणा येणे अशी याची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसू लागताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
