सांगोला : शहरातील नामांकित शारदा इंटरप्रायजेस चे मालक दत्तात्रय गोविंद जाधव यांची सांगोला नागरी सहकारी पतसंस्था चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत जाधव यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.
दत्तात्रय जाधव यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्यकारिणीत नवे नेतृत्व लाभल्याचा विश्वास सभासदांनी व्यक्त केला आहे. संस्थेच्या कार्याचा वेग आणि सेवा अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीबद्दल भीमराव विठोबा बनकर, गजानन विठोबा बनकर, विकास दिगंबर पिसे, सोमनाथ महादेव बनकर, आनंदा लिंगे, सोमनाथ महादेव नवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी दत्तात्रय जाधव यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
सांगोला शहरात या निवडीची उत्साहपूर्ण चर्चा असून संस्थेच्या भविष्यातील कार्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
