तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज? देवस्थानने घेतला मोठा निर्णय…
भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते तेल देवाला अर्पण केले जाणार नाही

इन पब्लिक न्यूज : शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र आहे. येथे शनीदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत असे येथील पुजारी सांगतात. मंदिरात लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी बारमाही येत असतात. अलीकडे मंदिराच्या समितीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची बजावणी १ मार्चपासून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर नेमके काय बदल होणार?
शनैश्वर देवस्थान मंडळाचा मोठा निर्णय?
शनैश्वर देवस्थान चौथऱ्यावर जाऊन देवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, भेसळयुक्त तेलामुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचे देवस्थान मंडळाने माहिती दिली. शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी तैलाभिषेक येतून पुढे फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेल वापरणे बंधनकारक केले आहे.
India AI Mission : भारत जगात लवकरच होणार AI चा राजा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी रणनीती
भेसळयुक्त तेलामुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने मंदिर समितीकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी १ मार्च २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे १ मार्चपासून शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागणार आहे. भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते तेल देवाला अर्पण केले जाणार नाही. तसेच हे तेल भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून हा निर्णय विश्वस्त मंडळाने हा घेतला आहे.