क्रीडादेश- विदेश

D Gukesh: “19 वर्षांचा गुकेशचं झंझावात! जगातील नंबर 1 बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला केले पराभूत!  


Norway Chess 2025: जगातील नंबर 1 बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला भारताचा तरुण ग्रँडमास्टर डी. गुकेशने नॉर्वे चेसच्या सहाव्या फेरीत पराभूत केलं. या पराभवानंतर कार्लसन पूर्णपणे हादरला होता. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्यामुळेच पराभव होताच त्याने संतप्त होऊन टेबलवर घूंसा मारत आपला राग व्यक्त केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.

कार्लसनने बोर्डवर मुठ ठोकली आणि निराश होऊन उद्गारला, “हे भगवान…”

या पराभवानंतर कार्लसनने क्लासिकल बुद्धिबळाबद्दल बोलताना म्हटलं,
“मला वाटत नाही की गुकेशविरुद्ध खेळणं मजेदार होतं. मला आता विचार करावा लागेल की यापासून कसं दूर राहता येईल… कदाचित मला क्लासिकल बुद्धिबळ खेळणं पूर्णपणे थांबवावं लागेल. मला हे अजिबात मजेदार वाटलं नाही. एकंदर मी स्पर्धेत चांगला खेळलोय, पण मला आता खेळण्यात मजा वाटत नाही. मी माझ्या खेळाच्या पातळीबाबत चिंतीत नाही.”

दुसऱ्या बाजूला, कार्लसनने डी. गुकेशचं कौतुक करत म्हटलं:
“मला आठवतंय, मीही त्याच वयात होतो आणि त्या वयातली ऊर्जा, झुंजारपणा, आणि आशावाद – हे कधी कधी तुमच्या चालींच्या गुणवत्तेपेक्षा अधिक प्रभावी ठरतात. बराच काळ, गुकेश डोळे बंद करून पुढे चालत होता. एखाद्या सामान्य दिवशी मी तो सामना सहज जिंकलो असतो. पण गुकेशची खासियत म्हणजे तो शेवटपर्यंत लढतो आणि हार मानत नाही. त्याने संधी घेतली आणि ती साधली. मला अशासंधी त्याच्यापासून दूर ठेवाव्या लागतील, नाहीतर माझ्याकडे काही संधीच उरणार नाही.”


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button