मुंबई / प्रतिनिधी: बॉलीवूडची ‘नॅचरल ब्यूटी’ श्रद्धा कपूर पुन्हा एकदा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोशूटमधील नव्या लुकने चाहत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे.

साधेपणातली उठावदार स्टाईल दाखवत श्रद्धाने पुन्हा सिद्ध केलं की ती ट्रेंडी असतानाही तिच्या क्युटनेसला तोड नाही!

श्रद्धाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत ज्यात ती पास्तेल रंगाच्या मिनिमल मेकअप लूकमध्ये दिसतेय.

केस हलक्याफुलक्या सैल वेव्ह्जमध्ये, चेहऱ्यावर गोड हास्य आणि डोळ्यांत चमक या लुकने फॅशन प्रेमींना भुरळ घातली आहे.

चाहत्यांनी कमेंट्समध्ये “डॉल”, “एंजेल इन ह्युमन फॉर्म”, “स्टनिंग”, “गॉर्जियस” अशा शब्दांनी भरभरून कौतुक केलंय. काहींनी तर तिला “बॉलीवूडची क्युटनेस क्वीन” असंही म्हटलंय.श्रद्धा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत असून लवकरच मोठ्या बॅनरसोबत ती स्क्रीनवर झळकणार असल्याची चर्चा आहे
