महाराष्ट्र

100 दिवसाच्या विशेष मोहिमेमध्ये एकूण 3 हजार 247 सनद वाटप


सोलापूर / प्रतिनिधी: राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी 100 दिवसांचा कृति आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय कार्यालयांकरीता देखील 100 दिवसांमध्ये नागरिकांच्या काही महत्वाच्या विषयांवर मोहिम घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश देणे आवश्यक होते. त्यामध्येच पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणले असल्यास त्याप्रमाणे 7/12 सदरी पोटखराब क्षेत्र कमी करुन लागवडीलायक क्षेत्रात वाढ करण्याचा सविस्तर सूचना दिनांक 13 मार्च 2025 रोजी परिपत्रक काढून देण्यात आले आहेत.

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिेलेख, पुणे यांचे दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या परिपत्रकानुसार महसुली गावातील जमीनधारकाने पोटखराब वर्ग (अ) ची जमीन लागवडीखाली आणल्यास अतिरिक्त आकारणी करावयाच्या कार्यपध्दती बाबत निर्देश दिले आहेत. या परिपत्रकानुसार जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आनने हा उद्देश आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडील परिपत्रक  दिनांक  13 मार्च 2025 अन्वये पोटखराब क्षेत्र लागवडीखाली अनेक कामी महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना कार्यपध्दतीबाबत कालबध्द कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

पोटखराब वर्ग (अ) मधील क्षेत्र लागवडीखाली आणल्यास अतिरिक्त आकारणी करणेचे अधिकार तहसिलदार यांना प्रदान करण्यात आले असून तहसिलदार यांचेस्तरावर तालुकास्तरीय समिती स्थापन करुन विशेष मोहिम राबविन्या बाबत निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे विशेष मोहिम राबवून लागवडीखालील पोटखराब गटाची संख्या 5082 क्षेत्र 2480.48 हे.आर शोध घेवून त्यापैकी 2888 गट क्षेत्र 1340.77 हे. आर लागवडीखली आणल्या बाबत आदेश पारित केलेले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये सदर विषयाबाबत अत्यंत चांगले काम झालेले आहे.

ही मोहिम प्रभावीरित्या राबविण्यात आलेमुळे पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आल्यामुळे लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणत वाढ होऊन महसूली उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच जमिनीमध्ये सुधारणा केल्यामुळे त्याच्या जमिनीच्या मूल्यात देखील वाढ होण्यास मदत होईल.

अंतिम विकास आराखडा DP मंजूर असलेल्या भागामध्ये 42 प्रमाणे प्रादेशिक व प्रारुप  विकास आराखडा मंजूर असलेलया 42क प्रमाणे व कोणत्याही गावठाणाच्या हद्दीपासून 200मी च्या आतील क्षेत्राकरीता 42ड  प्रमाणे अकृषिक वापराची सनद देणेत येते.

सदरच्या सनद प्रदान केल्यामुळे संबंधित जमीनधारकांना वेगळयाने अकृषिक परवानगी घेण्याची गरज भासत नाही. शासनाच्या 100 दिवस कृति आराखडा कार्यक्रमा पूर्वी सन 2017 ते सन 2024 पर्यंत 42ब, 42क व 42ड मध्ये एकूण 12 हजार 241 सनद प्रदान करण्यात आलेल्या होत्या. शासनाच्या 100 दिवस कृति आराखडा कार्यक्रमामध्ये विशेष मोहिम घेऊन सोलापूर जिल्हयात तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी एकूण 40 शिबीर घेण्यात आले. सोलापूर जिल्हयात 42ब, 42क व 42ड च्या 100 दिवसाच्या विशेष मोहिमेमध्ये एकूण 3 हजार 247 सनद वाटप करण्यात आले आहे. सनद प्रदान केल्या मुळे जमीन महसूलात वाढ होवून संबंधित मिळकतधारकांना त्यांचा  मिळकती मध्ये आकर्षित वापर सुरु करण्यास सुलभ झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button