अर्रर्रर्र! ‘पैसे नाहीत तर त्रास होणार पक्का!’ सोलापूर विद्यापीठातील धक्कादायक प्रकार!
Solapur University : मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशही बसवले धाब्यावर?

सोलापूर/विशेष प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील (Solapur University) एका अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत? ते कामासाठी लाखो रुपयांची मागणी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल, आणि महाविद्यालयीन प्राचार्य, कर्मचाऱ्यांना त्रास देण्यात माहीर असण्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित अधिकाऱ्याचं नाव उमराव मेटकरी (Solapur University) असल्याचं अधिकाऱ्यांनी ‘इन पब्लिक न्यूज’शी बोलताना माहिती दिली.
लाखों रुपये नाही दिले तर ‘हे’ करतात उलटसुलट कामं ?
विद्यापीठाशी (Solapur University) संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातील प्राचार्यांनी सांगितले, “उमराव मेटकरी हे प्रत्येक फाईल, कामासाठी थेट लाखोंची मागणी करतात. पैसे दिले नाहीत, तर जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करतात.” वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणे, दिशाभूल करणे व चुकीचा पत्रव्यवहार करून प्रशासनात गोंधळ निर्माण करणे हे त्याचे नित्यनेमाचे सुरु आहे.
मा. उच्च न्यायालयाचा आदेशही धाब्यावर?
मा. उच्च न्यायालय मुंबई व इतर यांचे सांगोल्यातील माजी ग्रंथपाल श्री. हेगडे सर यांच्या बाजूने तब्बल १६ निकाल दिले असून, त्यांच्या सेवेतील वेतन फरक, लाभ देण्याचे स्पष्ट आदेश विद्यापीठ प्रशासनाला (Solapur University) दिले आहेत. मात्र, उमराव मेटकरी यांनी त्या आदेशांची पायमल्ली करत त्यांना ते आर्थिक,मानसिक,सामाजिक त्रास देण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या आडमुठ्या वागणुकीमुळे न्यायव्यवस्थेचा अवमान होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या सगळ्यामागे फक्त “पैशाचा हव्यास” आहे.
“लाचखोर अधिकाऱ्याची तात्काळ बडतर्फ करावे” : संघटनांची मागणी
उमराव मेटकरी या अधिकाऱ्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत असून, त्यांची तात्काळ बडतर्फी व्हावी अशी मागणी अनेक संस्थांनी आणि महाविद्यालयांनी केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती कारवाई करून निष्पक्षता जपावी, अशी अपेक्षा आता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
सार्वजनिक शिक्षणसंस्थांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि कायद्याचा सन्मान राखला गेला पाहिजे. जर एका अधिकाऱ्यामुळे संपूर्ण व्यवस्थेचा अपमान होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशीअपेक्षा जनतेकडून आणि शैक्षणिक क्षेत्राकडून केली जात आहे.
पाहा पुढील भागात…!
मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्या निकालाची पायमल्ली….
कोणाचेही, कशाचीही भीती न बाळगता पत्रकारांना दमदाटी धमक्या कशा प्रकारे…
“मी कुणालाही घाबरत नाही!” हा उर्मटपणा कोणाच्या…
“शिक्षण क्षेत्रातील नियम, कायदे, इतर माहिती नसलेले विद्यापीठाचे मोठ्या पदावर…
“उच्च स्तरीय अधिकाऱ्यांचे अशोभनीय …