डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात तुफान खडाजंगी? झोपलेल्या संस्थाचालकांना जागे होण्याही गरज !
शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान, पण सध्याची स्थिती बिकट ?

सांगोला : डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून संस्थाचालक,प्राचार्य,शिक्षक यांच्यामध्ये तणाव वाढलेला दिसून येतोय. प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यात टोकाचे वारंवार वाद होत आहेत. एवढेच नाही तर वादाचे रूपांतर अनेकदा शिवीगाळ आणि मारहाणीतही झाले आहे. शिक्षणासाठी समर्पित असलेल्या या संस्थेत अशा घटना घडणे ही चिंतेची बाब आहे असे प्राध्यापकांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना सांगितले.
शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान, पण सध्याची स्थिती बिकट ?
स्व. आमदार डॉ. गणपतराव देशमुख यांनी सांगोला सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे महाविद्यालयाचे रोपटे लावले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संस्थेतून अनेक विद्यार्थी उच्च पदांवर, देश-विदेशात कार्यरत आहेत.
मात्र, नवे संस्थाचालक यांना संस्थेतील कारभाराचे ज्ञान नसल्याचा आरोप पालक आणि शिक्षकांनी केला आहे. तर मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणारी ही संस्थेची देशातील पहिली संस्था म्हणून ओळख निर्माण होत आहे, अशी टीका होत आहे.
संस्थाचालकांचे दुर्लक्ष? विद्यार्थ्यांचे नुकसानीस कोण जबाबदार ?
सचिवाच्या बेकायदेशीर, नियमबाह्य,मनमानी संस्थेच्या कारभारामुळे संस्थेस अतोनात नुकसान सोसावे लागत आहे असा आरोप शिक्षक आणि कर्मचारी करत आहेत.
संस्थाचालक-प्राचार्य यांच्यातील वाद वाढत असल्याने शैक्षणिक वातावरण बिघडत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, याला जबाबदार कोण? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुण्यात जलसंपदा विभागाची बैठक; आ. बाबासाहेब देशमुख आक्रमक
शिक्षण संस्थेत अशांतता का?
सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, संस्थाचालक हे फक्त नावापुरते आहेत आणि संपूर्ण कारभार सचिवांच्या हातात आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला असून, याचा थेट परिणाम संस्थेच्या शैक्षणिक वातावरणावर होत आहे.
पालक आणि विद्यार्थ्यांची केली मागणी
संस्थेतील वाढत्या वादामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याने शासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ यामध्ये हस्तक्षेप करून मनमानी कारभार थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे.