सांगोला : शहरातील सदगुरु हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय गावडे यांच्या वादग्रस्त कारभाराचे पडसाद सातत्याने उमटत असताना ‘इन पब्लिक न्यूज’च्या वृत्तांकनाचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. रुग्णांची लूट, आवाजवी बिलिंग, हॉस्पिटलमधील भांडणे, गैरव्यवहार, वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली आणि योजनांचा गैरवापर यांसारखे गंभीर आरोप गेल्या काही दिवसांपासून समोर येत होते. याबाबत इन पब्लिक न्यूजने केलेल्या वास्तवदर्शी बातम्यांनंतर जोरदार इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे.
उच्चस्तरीय चौकशी सुरू: व्यवस्थेत धडाधड बदल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरू असलेल्या गैरकारभारानंतर सदगुरु हॉस्पिटलमध्ये उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला असून पोलीस प्रशासनातही तक्रारी दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर हॉस्पिटलमधील अनेक गोष्टींमध्ये तातडीने बदल करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.
यूट्यूबरला विकत घेण्याचा प्रयत्न? – पत्रकारांनी हाणून पाडला डाव
चौकशीची धग वाढत असताना डॉक्टर गावडे यांनी स्वतःचा गवगवा करण्यासाठी खेडेगावातील एका अडाणी, अशिक्षित यूट्यूबरला आर्थिक प्रलोभन देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पत्रकारांना दिशाभूल करण्यासाठी या यूट्यूबरने अनेक पदांचा गैरवापर करत अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे टॅग वापर करण्याचा घातक प्रयत्न करण्यात आला. तसेच लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकारांनी या चुकीच्या प्रकरणाला दुजोरा न देता प्रामाणिक भूमिका घेतल्याने गावडे यांचा हा डाव अक्षरशः हाणून पाडला.
या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
लोकप्रतिनिधी अशा गोष्टींना दुजोरा देणार काय?
लोकप्रतिनिधींचे या सर्व गैरप्रकाराबद्दल लक्ष देऊनशहरात सुरू असलेल्या आरोग्य सेवेला धक्का लागत असलेल्या आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या गैरप्रकाराला लवकरात लवकर चाप देऊन आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.
ज्येष्ठांची संतप्त प्रतिक्रिया : “अशा दवाखान्यांची आणि अडाणी यूट्यूबर्सची गरज नाही!”
या प्रकरणानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही ज्येष्ठांनी थेट टीका करत म्हटले—
> “100-200 रुपयांना विकत गेलेले अडाणी यूट्यूबर्स आणि अशा वादग्रस्त दवाखान्यांची सांगोल्यात काहीच गरज नाही. लोकांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”
डॉक्टर गावडे यांना संपर्क – उत्तर देण्याचे टाळाटाळ
इन पब्लिक न्यूजने थेट डॉक्टर गावडे यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास नकार देत पळ काढल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, काही स्थानिक संघटनांनीही संपर्क केला असता गावडे यांनी उलट दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्या वर्तनावर संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘इन पब्लिक न्यूज’च्या बातम्यांनंतर सांगोल्यातील हॉस्पिटलमधील अनेक प्रकार उघडकीस आले. प्रतिमा सुधारण्यासाठी यूट्यूबरला विकत घेण्याचा प्रकार हा सर्वांत लज्जास्पद व धक्कादायक ठरला आहे. आता चौकशीचा पुढील अहवाल आणि अधिकाऱ्यांची कारवाई याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
