
Solapur Collector Office
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातील 15 शासकीय कार्यालयात 38 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयांनी तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा. तसेच तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली वर्तणूक ठेवावी असे निर्देश महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिले.
यावेळी भुसंपादन समन्वय अधिकारी संतोषकुमार देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, आरोग्य विभागाचे डॉक्टर विजय वरवटकर, तहसिलदार पुनर्वसन सरस्वती पाटील, यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी पुढील प्रमाणे : जिल्हा परिषद सोलापूर- 16, भुसंपाद समन्वय शाखा-3, अधीक्षक अभियंता महावितरण सोलापूर-3, सहायक कामगार आयुक्त सोलापूर-1, उपविभागीय अधिकारी पंढरपूर-1, जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर-1, तहसिलदार महसूल-3, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन-1, कार्यकारी अभियंता पाठबंधारे प्रकल्प मजबुतीकरण विभाग, धाराशिव-1, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम सोलापूर-1, दुय्यम चिटणीस सोलापूर-1, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण-2, उपनिबंधक सहकार सोलापूर-1, तहसिलदार दक्षिण सोलापूर-1, तहसिलदार मोहोळ-1 व एका अर्जदारास संबंधित विभागाने परस्पर उत्तर दिले असून, एकुण 38 तक्रारी अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या आहेत.