लालपरीतून प्रवास करत पाहणी करण्याचा योग म्हणजे “भाग्याचा क्षण”: आमदार शहाजीबापू पाटील

विशेष प्रतिनिधी : सांगोला एस.टी. आगाराला नव्याने मिळालेल्या पाच लालपरी बसांचे लोकार्पण आज आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना त्यांनी लालपरीतून प्रवास करत पाहणी करण्याचा योग म्हणजे “भाग्याचा क्षण” असल्याची भावना व्यक्त केली.
शाहाजीबापूंनी स्वतः प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन, सांगोला तालुक्यातील प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी समोर मांडल्या. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री यांनी टप्प्याटप्प्याने बसगाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे बसेस पहिल्या टप्यात ५ बसेस मिळाल्या.


नवीन बसमधून स्वतः प्रवास करून पाहणी केल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, प्रत्येक प्रवाशाला आरामदायी बससेवा मिळावी हा उद्देश होता. या नव्या बसेसमध्ये मोबाईल चार्जिंग पॉइंट, आरामदायी आसनव्यवस्था आणि उत्कृष्ट वातानुकूलन यामुळे लांब पल्ल्याचा प्रवासही सुखकर होणार आहे.

या नव्या बसेस अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाने सुसज्ज असून प्रवाशांच्या सुविधेसाठी खास डिझाइन करण्यात आल्या आहेत. एस.टी. महामंडळाच्या या पावलाचे शहाजीबापूंनी कौतुक केले आणि सांगोला परिसरातील नागरिकांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरेल, असेही ते म्हणाले.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!