
Chief Minister Devendra Fadnavis
सोलापूर/श्रीराम देवकते : राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे शनिवार, दिनांक 29 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10:20 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.25 वाजता हेलिकॉप्टरने तुळजापूर जिल्हा धाराशिव कडे प्रयाण. सकाळी 11:45 वाजता तुळजापूर येथून हेलिकॉप्टरने पंढरपूर जिल्हा सोलापूर कडे प्रयाण. सकाळी 12:10 वाजता जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका हेलिपॅड पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आगमन. दुपारी 12.15 वाजता मोटारीने हेलिपॅड येथून मोटारीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर कडे प्रयाण. दुपारी 12.25 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आगमन व दर्शन. दुपारी 12.50 वाजता विठ्ठल मंदिर येथून शासकीय विश्रामगृह पंढरपूरकडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण, जिल्हाधिकारी सोलापूर. दुपारी 1.50 वाजता शासकीय विश्रामगृह येथून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थान कडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता मोटारीने पंढरपूर रोपवाटिका हेलीपॅड कडे प्रयाण व दुपारी 2.25 वाजता हेलिकॉप्टरने प्रयाण.

मुख्यमंत्री यांचे पंढरपूर येथे आगमन
पंढरपूर हेलिपॅड येथे माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्वागत केले. यावेळी कोल्हापूर पोलिस परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते.
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आगमन झाले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार समाधान आवताडे, गोपीचंद पडळकर, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील स्वर्गीय प्रभाकर परिचारक यांचे वृद्धपकाळाने निधन झालेले होते. तरी आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी श्री प्रशांत परिचारक यांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वन पर भेट घेतली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार कल्याणशेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, उमेश परिचारक आदी उपस्थित होते.
