विशेष प्रतिनिधी : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार सांगोला तालुक्यात मंगळवारी ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार माजवला. तब्बल पाच तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले, काही गावांमध्ये ओढ्याचे पाणी घरात घुसले. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी व घरांचे मोठे नुकसान झाले असून कष्टकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.
नुकसानीचे चित्र गंभीर
शेतजमिनीतील उभी पिके पाण्याखाली गेली.
अनेक घरांना पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत.
ढगफुटीमुळे जनावरांच्या गोठ्यांनाही फटका बसला.
ढाण्या वाघाची साथ : शहाजी बापू पाटील थेट मैदानात
नुकसानीची माहिती मिळताच सांगोल्याचे मा. आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट गावोगावी जाऊन पाहणी केली. ग्रामस्थांना धीर देताना ते म्हणाले :
“मी आहे… तुम्ही काळजी करू नका.
प्रत्येक नुकसानीची पै-पै तुम्हाला मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधीची कमतरता पडू देणार नाही.”
अधिकाऱ्यांना थेट सूचना
शहाजी बापू पाटील यांनी अधिकाऱ्यांशी बांधावरून थेट संपर्क साधत तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धान्य वाटप.
काही दिवसांसाठी खाण्यापिण्याची तातडीची व्यवस्था.
नुकसानग्रस्त भागात आवश्यक उपाययोजना.
या मुसळधार पावसामुळे सांगोला तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असली तरी ढाण्या वाघ शहाजी बापू पाटील यांच्या दिलासा भेटीमुळे नागरिकांमध्ये नवसंजीवनीचे वातावरण आहे.
