सांगोला : तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली. घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले असून ऐन नवरात्री सण उंबरठ्यावर आला असता मोठे संकट ओढावले होते.
परिस्थिती गंभीर
- मुसळधार पावसामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या.
- अनेक घरांमध्ये पाणी शिरले; जनजीवन विस्कळीत झाले.
- नवरात्री उत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या गावकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीने धक्का
आजी-माजी आमदारांचा तातडीचा पाठपुरावा
घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी तातडीने दौरे करून नागरिकांना धीर दिला आणि मदतीची हमी दिली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पाहणी दौरा
पूरस्थितीची माहिती मिळताच आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सांगोला तालुक्यातील पूरग्रस्त भागात पाहणी दौरा होणार आहे. त्यावेळी ते थेट गावकऱ्यांशी संवाद साधून मदतीसंदर्भात निर्णय घेतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नागरिकांना प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
