देश- विदेशशैक्षणिक

चौगुले सायन्स क्लासेस मध्ये इयत्ता ११ वीचे वर्ग सुरू


सांगोला : सांगोला तालुक्यासह परिसरात एम. एच.टी.सी.ई.टी. , अकरावी व बारावी वर्गासाठी नावलौकिक व आतापर्यंत सर्वाधिक गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना Government तसेच ऑटोनॉमस् कॉलेजेस मध्ये   पाठवणारा क्लास म्हणून ओळख असणाऱ्या चौगुले सायन्स क्लासेस मध्ये दिनांक १ जून पासून इयत्ता अकरावी चे वर्ग चालू झाले.

बारावी परीक्षेमध्ये सांगोला तालुक्यात सर्वाधिक जास्त रिझल्ट देऊन १जून पासून अकरावी वर्गाचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. सी.ए. साहेब तुषार ढेरे, डॉ. विवेकानंद विभुते, उद्योगपती दत्तात्रय जांभळे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सी.ए.तुषार ढेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ध्येय निश्चित केल्यानंतर त्यासाठी सातत्य महत्वाचे असते तसेच वेळेत ध्येय निश्चित केल्यानंतर काय फायदा होतो हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले त्याचबरोबर इयत्ता बारावी नंतर असणाऱ्या करियर बद्दल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमप्रसंगी बोलताना डॉ. विवेकानंद विभुते यांनी शालेय जीवनात कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत त्याच बरोबर ध्येय निवडल्यानंतर विद्यार्थ्यांनी भरपूर प्रयत्न करावेत, मोबाईल चा अतिवापर करू नये, शिस्त व वेळेचा सदुपयोग यावर बहुमोल मार्गदर्शन केले.

सांगोला सारख्या ग्रामीण भागात असलेल्या चौगुले सायन्स क्लासेसच्या सर्व शैक्षणिक सुविधांचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे मत मांडले व इयत्ता अकरावी च्या बॅच ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय चौगुले सर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. मल्हारी बनसोडे सर यांनी केले तर आभार कृष्णा घुंबरे सर यांनी मानले. या प्रसंगी प्रा. विकास घाडगे , प्रा.महेश दौंड, प्रा.कुलदीप जाधव तसेच सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button