पूर्णा – सुहागन हयातनगर रस्ता काम निकृष्ट होत असल्याची नागरिकांची तक्रार
अंदाजपत्रकाप्रमाणे होत असल्याचा बांधकाम विभागाचा निर्वाळा

परभणी/प्रतिनिधी : पूर्णा तालूक्यातील पूर्णा ते आडगाव-बरबडी-सुहागन-आव्हई शिवार तालूका हद्द पर्यंत (शिरडशहापूर हयातनगर पूर्णा राज्यमार्ग ४२८) या ८ किमी ८०० मिटर लांबी रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत चालू आहे.सदर रस्ता काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार सुहागन येथील काही नागरिकांनी उप अभियंता यांना दिली होती.सदर रस्त्यावर उभे राहून रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरणाचे काम खराब होत असल्याचे सबंधीत सा.बां खात्याचे अभियंता यांना आणून दाखवण्यात आले होते. त्यावेळी झालेले काम खोदून तपासणीही करण्यात आली असता तक्रारकर्ते ग्रामस्थ नागरीकांचे म्हणने होते की हे काम निकृष्ट करण्यात आले.
परंतू,या सर्व प्रकारावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग पूर्णाचे कामावर नेमणूक केलेल्या अभियंता यांनी निर्वाळा दिला आहे की,सदर रस्ता काम मजबुतीकरण व डांबरीकरण करताना डब्लू एम एम चा तर देवून त्यावर बि एम (५० मि मी) च्या थराचे काम प्रगतीत असून त्यावर ३० मिमी बी सी चा थर देण्यात येणार आहे.
सदर कामाची वेळोवेळी चाचणी निष्कर्ष घेण्यात आलेला आहे.त्याच बरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.सदरील रस्ता काम अंदाजपत्रकानूसार चांगल्या गुणवत्तेने होत आहे.असा निर्वाळा सा.बां.पूर्णा उपविभागाचे अभियंता शिंदे यांनी सांगितले.