जिल्ह्यात शेतकरी उध्वस्त असताना काडीची मदत नाही, परंतु होतीय लाखोंची उधळण ? : संतप्त पूरग्रस्त
सोलापूर/प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे अनेकांची घरे शेती वाहून गेली आहेत राज्यातून सोलापूर जिल्ह्यासाठी मदत देखील येत आहे पाऊस बंद झाला असला तरी शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा वाहून गेलेली शेती हे अत्यंत विदारक दृश्य जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर परिस्थितीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत करण्याचे आव्हान केले. यानंतर राज्यातून मंदिरे,सामाजिक संघटना, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार संघटना यांचेकडून मदतीचा हात पुढे सरसावत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये कोट्यावधी रक्कम व जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी केला आरोप म्हणाले…
शिकून अडाणी असलेल्या विद्यापीठातील प्रशासनाकडून जगाच्या पोशिंदासाठी मदत करणे दूरच परंतु “शेतकऱ्यांच्या अश्रूची चेष्टा केली” जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
सोलापूर विद्यापीठाने युवा महोत्सव 2025 हा 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केला आहे. काही संघटनांनी, शैक्षणिक संस्थांनी, विद्यार्थ्यांनी पुढे ढकलण्याची मागणी केली होती, कारण काही महाविद्यालये, अनेक गावे पाण्यात गेली आहेत. यामुळे त्या भागातील विद्यार्थ्यांना अनेक सरावासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु विद्यापीठाने काही मोजक्याच महाविद्यालयातील प्राचार्यांना घेऊन बैठक घेतली. यामध्ये युवा महोत्सव आहे त्याच वेळेत होणार असल्याची माहिती देण्यात आली.
विद्यापीठातील प्रशासन शिकून अडाणी!
सोलापूर विद्यापीठातील प्रशासन शिकून अडाणी पुन्हा एकदा पाहायला मिळाले. विद्यापीठाने अतिवृष्टीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या परंतु प्रशासनाला युवा महोत्सव हा परीक्षा पेक्षाही जास्त महत्त्वाचा वाटतो. महाविद्यालयामध्ये सरासरी 5000 विद्यार्थी असतात यामधील सगळेच विद्यार्थी या महोत्सवाला येत नसतात अशी परिस्थिती असताना परीक्षा पुढे गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते हे सुद्धा या आडमुठ्या प्रशासनाला माहिती आहे नाही का? ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे काही महाविद्यालयांमधून माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांचे हित की महोत्सव? : विद्यार्थी संघटनांचा सवाल
विद्यार्थ्यांची हित महत्त्वाचे की युवा महोत्सव महत्त्वाचा? या आडमुट्या प्रशासनाला कधी लक्षात येणार विद्यार्थ्यांचे फक्त नुकसान करायचे हेच या प्रशासनाकडून सुरू असते. स्वतःच्या तुंबड्या भरून घ्यायच्या आणि विद्यार्थ्यांचे नुकसान करायचे हेच प्रशासन करत आले आहे असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला आहे.
