ओsss आम्ही माणूस आहे ! टार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना जनावरांसारखं चालवले
एक व्यक्ती गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यासारखा गुडघ्यांवर चालवले

कोच्ची : केरळच्या कोच्ची शहरातून एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका खासगी मार्केटिंग कंपनीत टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना गळ्यात पट्टा बांधून, गुडघ्यांवर चालण्यास भाग पाडण्यात आल्याचे व्हिडिओत दिसून येते. हा प्रकार जणू एखाद्या प्राण्याला वागवल्याप्रमाणे असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
धक्कादायक व्हिडिओ संबंधित कंपनीतील एका माजी व्यवस्थापकाने आपल्या मोबाईल फोनवर शूट केली होती. त्यानेच हा व्हिडिओ आता व्हायरल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “सदर माजी व्यवस्थापक आणि कंपनीच्या मालकामध्ये मतभेद होते. याच रागातून त्याने प्रशिक्षणार्थींना वापरून एक व्हिडिओ तयार केला आणि त्यास ‘ट्रेनिंगचा एक भाग’ असल्याचा दावा केला.”
एक व्यक्ती गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यासारखा गुडघ्यांवर चालवले . या प्रकारामुळे नागरीकामध्ये संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी अशा अमानुष प्रशिक्षण पद्धतीचा तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाकडून याप्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.